Saturday, August 20, 2011

मशाल क्रांतीची



उडाला भडका
वाजवा डंका
पेटवा लंका
पेटली मशाल क्रांतीची

सर्वत्र विखारी नाग
धुमसली आंतरिक आग
भडकला सार्वजनिक राग
पेटली मशाल क्रांतीची

स्फुरले तारुण्य
सळसळले रक्त
हादरले मदांध तख्त
पेटली मशाल क्रांतीची

काव्य केले शस्त्राने
रक्त सांडले लेखणीने
भूमीस लाल-अभिषेक
पेटली मशाल क्रांतीची

सृष्टी-पुत्रांनीचं पुकारला

प्रती-सृष्टीचा उष:काल
भास्कराने पुनश्च: डोळे उघडले
झाले मुक्त आकाश सारे
पेटली मशाल क्रांतीची

आता,
तुचं तुझा चित्रकार
तुचं तुझा शिल्पकार
तुचं देणार या प्रतिसृष्टीस आकार...